This is our future
My Social Work
पाणपोई चा शुभारंभ
दिनांक 30 मार्च, 2025रोजी ज्योतिर्मय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने चांदूर बाजार जी. अमरावती येथे रामार्पण जनरल स्टोअर्स समोर पाणपोई सुरू करण्यात आली.पाणपोई चे उद्घाटन ज्येष्ठ नागरिक श्री. रामेश्वरराव ताथोड यांच्या शुभहस्ते झाले. रखरखत्या उन्हाळ्याच्या दिवसात वाटसरुंची तहान भागविण्यासाठी थंड पेयजलाची व्यवस्था या पाणपोईच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. श्री. धीरज राणे यांच्या संकल्पनेतून आणि संस्थेचे अध्यक्ष -अशोकजी तोडकर यांनी केलेल्या आर्थिक मदतीच्या माध्यमातून हा सेवार्थ उपक्रम सुरू केलेला आहे.
